The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, (चेतन गहाने) दि. ०६ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आज बुधवार ०६ डिसेंबर २०२३ रोजी महापरिनिर्वाण दिन*
साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील ज्येष्ठ लिपिक अनिल बांबोळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक कालिदास सोरते हे होते. याप्रसंगी भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल बांबोळे यांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भिमगित सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्राध्यापक कालिदास सोरते यांनी आपल्या मनोगतातून म्हंटले कि विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे बनण्याचा प्रयत्न करावा . कार्यक्रमाचे संचलन व आभार प्राध्यापक गुरुदास शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील प्राध्यापक मनोज सराटे, रुपेश भोयर , स्वप्नील खेवले, ओमप्रकाश कुथे, मुनेश्वर राऊत प्राध्यापिका वाट शिक्षकेतर कर्मचारी शिवा भोयर, घनःश्याम भोयर तथा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.