– तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची जिल्हाअधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : अतीदुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्हातील सर्व प्रशासकीय विभागातील (क व ड ) संवर्गातील पदे पोलिस भरती प्रमाणे स्थानिक उमेदवाराकडुन भरण्यात यावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाअधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे
निवेदन देताना असंख्य युवा बेरोजगार तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह उपस्थित होत्या.
गडचिरोली जिल्ह्यात प्रशासकीय विभागात अनेक जागा पदे अद्यापही रिक्त आहेत, जिल्ह्यात अनेक बेरोजगार असून याकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेत सदर रिक्त जागा भरतांना स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे याकरिता जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
