मोबाईलद्वारे करता येणार स्वत:सह इतर ५० जणांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची केवायसी

515

– एकाच मोबाईलवर ई केवायसीची सुविधा
The गडविश्व
गडचिरोली, ०१ जून : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजने अंतर्गत १४ व्या हप्त्याच्या वितरण नियोजनासाठी ०१ मे पासून सुरूवात झाली आहे. राज्यात गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवून ई केवायसीसाठी सामाजिक सुविधा केंद्र व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी पोस्ट बँकद्वारे (India Post Payment Bank) यांच्या सहकार्याने ई-केवायसी व आधार लिंक करणेची कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा १४ व्या हप्त्याचा पी.एम.किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जाहीर केले आहे. केंद्र शासनाने पी.एम.किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्राव्दारे लाभार्थींची ई-केवायसी करणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पी.एम.किसान ॲप मोबाईल वर चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) व्दारे पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नविन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरणासह इतर ५० लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे.

मोबाईल द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण असे करा

“PMKISAN GoI” या नावाचे ॲप गुगल प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहे. ज्या लाभार्थ्यांच्या मोबाईल मध्ये जुने ॲप असेल त्यांनी ते काढून पुन्हा पी.एम.किसान २.०.० हे अप्लीकेशन टाकावे. त्यानंतर येणा-या स्क्रीन वर इंग्रजी व हिंदी या दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यापैकी एक पर्याय निवडावा. समोर दिसणा-या स्क्रीनमध्ये लाभार्थ्यांनी लॉगइन करावे. या अँपच्या वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम.किसान आयडी / Registration Id किंवा आधार क्रमांक आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असेल त्यांना तसा संदेश दिसेल. म्हणजेच त्या लाभार्थ्याची ई-केवायसी प्रलंबित आहे. नंतर समोर दिसणा-या ई-केवायसी या लिंक वर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी पीन प्रविष्ठ करावा. तद्नंतर समोर दिसणा-या स्कॅन फेस या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर फेस आरडी ॲप ची लिंक येईल ते ॲप घ्यावे. त्यानंतर मोबाईल मध्ये Capturing Face सुरु होईल त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल समोर धरून चेह-यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने Scan Face या बटनावरती क्लिक करावे. तद्नंतर Image captured successfully processing असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. इतर लाभार्थींची e-KYC करावयाची असल्यास Dashboard वरील e-KYC for other beneficiaries” या बटनावर क्लिक करावे व पुन;श्च वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी. जर हे शक्य नसेल तर नेहमी प्रमाणे सीएससी मार्फत प्रक्रिया पुर्ण करावी.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, e kyc pm kisan yojna)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here