The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १ जून : संकल्प फाउंडेशन गेवर्धा व जय विक्रांता क्रिकेट क्लब कुरखेडा च्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा बघता सामाजिक बांधिलकीचे नाते जोपासत आज उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदात्यांमध्ये विविध धर्म विविध जाती तथा कर्मचारी व्यापारी युवक शेतकरी विविध पक्षाचे नेतृत्व व संकल्प फाउंडेशन व जय विक्रांता क्रिकेट क्लब चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले. याप्रसंगी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश बोरकर व त्यांचे संपूर्ण सहकारी जय विक्रांता क्रिकेट क्लबचे अध्यक्ष व नगरसेवक सागर निरंकारी व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, kurkheda, blood donet camp)
