मुनघाटे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

136

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ सप्टेंबर : येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे डॉ. आर. किरमिरे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे डॉ. जी. एन. चुधरी, डॉ. विना जम्बेवार, डॉ एच. लांजेवार, प्रा. मानतेश तोंडरे, डॉ.प्रवीण गोहणे, डॉ. सचिन धवणकर, डॉ. पठाडे, प्राध्यापक पुण्यप्रेड्डीवार, गीताचंद्र भैसारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर.किरमरे सरांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला द्वीप प्रज्वलित आणि पुष्प माल्यार्पण करून केली. शिक्षक दिनाच्या औचित्याने डॉ.किरमिरे सर यांची महाविद्यालयातून प्राध्यापक पदी बढती झाल्याने सर्व शिक्षक वृंद व कर्मचार्‍यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.किरमिरे सर यांनी अध्यक्ष भाषणातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत जीवन जगत असताना व त्यांची जबाबदारी यावर भाष्य करून मार्गदर्शन केले तसेच प्रमुख अतिथी यांनी सुद्धा याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बीए भाग 2 चा विद्यार्थी लखन वाढई यांनी शिक्षक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार डॉ.पठाडे यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सर्व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here