– कार्यालयात जायचे कसे ? नागरिकांचा प्रश्न
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ सप्टेंबर : धानोरा नगरपंचायत येथील जुन्या इमारतीत प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर नगरपंचायत येथील कर्मचारी प्रधानमंत्री आवास योजने च्या कार्यालयासमोर दुचाकी वाहने दररोज उभी ठेवतात. त्यामुळे त्या कार्यालयात जाण्यासाठी अजिबात रस्ताच नसतो. त्यामुळे कार्यालयात जायचे कसे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय आहे. याच कार्यालया अगदी समोर नगरपरिषदेचे कर्मचारी आपले दुचाकी वाहन उभे करून ठेवतात. त्याचा त्रास कार्यालयात ये जा करनाऱ्या नागरिकांना होत आहे. नगरपंचायत समोर जागा असुन सुध्दा हि वाहने या ठिकाणी लावल्या जात असल्याचे कळते. वाहने समोरच असल्याने येणाऱ्या नागरिकांनी कार्यालयात जायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अगदी दरवाज्या समोर च वाहने उभे असल्याने कार्यालयात नागरिकांना जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय आहे कि मोटार स्टॅन्ड आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.