The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २१ : तालुक्यातील सोनसरी शेतशिवारात मोहफुलाची अवैध दारुभट्टी सुरू असल्याच्या गोपनीय माहीती वरून कुरखेडा पोलिसांनी धडक देत १ लाख १५ हजार रुपये किंमतीची दारू व मोहसडवा जप्त केला तसेच आरोपी मोहन दहिकर (वय ४४) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असली तरी छुप्या मार्गाने दारूची विक्री केली जाते. कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील मोहन दहिकर हा गावाजवळच स्वतःच्या मालकीच्या शेतातील झोपडीत मोहफुला पासून तयार करण्यात येणारी हात भट्टीची दारू गाळत होता. पोलीसानी येथे धडक दिली असता पूर्वीच पोलिसांची कुणकुण लागल्याने तो घटणास्थळावरून पळून गेला. पोलीसानी येथून २५० लिटर गाळलेली दारू, ५ क्विटंल ९० किलो मोहसडवा, गॅस शेगडी, रेगूलेटर,गॅससिलेंडर जप्त केला व आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केला.
सदर कार्यवाही ठाणेदार महेंद्र वाघ यांचा नेतृत्वात पोलीस हवालदार शेखलाल मडावी, पोलीस शिपाई प्रदिप भसारकर, पोलीस शिपाई, नंदकिशोर मेश्राम यांच्या चमूने केली. प्रकरणाचा पुढील तपास हवालदार शेखलाल मडावी करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #crimenews )