कुरखेडा : तणसीच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने गावात हाहाकार, संपूर्ण तणस जळून खाक

540

-तणस जळून खाक
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ५ जून : शेतशिवारात लावलेली आग शेजारील तणसीच्या ढिगाऱ्याला लागल्याने संपूर्ण तणस जळून खाक झाल्याची घटना ४ जून रोजी भर दुपारी कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथे घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्याची तणस जळून खाक झाल्याने मात्र त्याचे नुकसान झाले झाले आहे.
कुरखेडा तालुक्यापासून दोन किमी अंतरावर असलेल्या कुंभीटोला गावाशेजारी असलेल्या शेतशिवारात एका शेतमालकाने भर दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात आग लावली. मात्र सदर आग ही शेताला लागूनच असलेल्या प्रकाश अंबादे यांच्या वाढीतील तणस ला लागल्याने यात संपूर्ण तणस जळून खाक झाली. तसेच यात मनोहर अंबादे यांच्या बाथरूमला सुद्धा आग लागल्याने तेथील कपडे व साहित्य जळून खाक झाले आहे.
सदर आगीची तीव्रता एवढी होती की गावात हाहाकार माजला होता. आग लागल्याचे माहिती होताच गावकरी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न करीत होती परंतु आग आटोक्यात येत नव्हती. घटनेची माहिती देऊन कुरखेडा नगरपंचायत येथून अग्निशामक वाहन बोलाविण्यात आले व आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले यावेळी नागरिकांनी एकच निस्वास सोडला.
आगीने उग्ररूप धारण केल्याने गावालगत असलेल्या लाकडी कौलारू घरांना आग लागण्याची दाट शक्यता होती. तणस जळल्याने मात्र अंबादे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतमालकाच्या एका चुकीमुळे मुक्या जनावरांना चारा पासून वंचित राहायची वेळ आली आहे. वृद्ध महिलेला नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी करीत आहे.

गावालगतच्या विटाभट्टी पासून धोका

गावा लगतच काही अंतरावर मोठ्या प्रमाणात विटाभट्टी पेटवित असल्याने त्यापासूनही गावात आग लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गावापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या विटाभट्टींना परवानगी द्या गावाशेजारी विटाभट्टी पेटवू नका असे निवेदन गावकऱ्यांनी दिले परंतु वारंवार सूचना देऊन सुद्धा मुजोर विटाभट्टी धारक कोणालाही ना जुमानता पुन्हा गावाजवळच विटा टाकून भट्टी पेटवत आहेत. तात्काळ त्या विटा भट्टी धारकांवर कारवाई करण्यात यावी व त्यांना सहकार्य करणारे गावातील पोलीस पाटील व सरपंच यांची सुद्धा चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांकडून महसूल विभागाला देण्यात आला आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli kurkheda, kumbhitola)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here