अखेर संतप्त शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नेला तहसील कार्यालयात

236

– नायब तहसीलदारांनी तात्काळ उपलब्ध करून दिले शासकीय गोडाऊन
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, ५ जून : देसाईगंज तालुक्यात अद्यापही मकाची शासकीय खरेदी सुरू न झाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी मका भरलेल्या ट्रॅक्टर वजन काट्यासह तहसील कार्यालयात नेत आमच्या मक्याची खरेदी सुरू करा अशी मागणी केली. दरम्यान नायब तहसीलदार बोढे व पुरवठा निरीक्षक पाटील यांनी मका खरेदीसाठी शासकीय गोदामाची व्यवस्था करून दिली व बाजाराची मागणी करून उद्यापर्यंत बारदाना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून हलवले.
संपूर्ण जिल्ह्यात शासकीय मका खरेदी सुरू झालेली असून देसाईगंज तालुक्यात मात्र अद्याप मका खरेदी सुरू झाली नाही. अर्ध्याहून शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याला बेभाव मकाची विक्री केली आणि आता ऐन पाऊस तोंडावर आला असतानाही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ट्रॅक्टर घेऊन तहसीलदार देसाईगंज यांना विचारणा केली. याची दखल घेत मात्र प्रभारी नायब तहसीलदार बोडे यांनी पुरवठा निरीक्षक यांना खाली बारदाना व गोडाऊन ची व्यवस्था करून घेण्याचे मार्गदर्शन केले व यावर तोडगा निघून शेतकऱ्यांनी आपली ट्रॅक्टर तहसील कार्यालयाबाहेर काढले. विसोराचे माजी सरपंच नितीन बनसोड, डॉ.ओम बनसोड, अरुण राजगिरे, एकलपूर येथील ज्ञानदेव पिलारे, वैभव कुरर्जेकर, संदीप डोंगरवार, रमेश बनसोड, संजय अवसरे, तुकाराम बुद्दे, अजय नाकाडे, भाऊराव नाकाडे, दीपक बनसोड, गोपाल नाकाडे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here