– चार वर्षांसाठी मिळणार शिष्यवृत्ती, शाळेत उत्साहात सत्कार
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०३ : आदिवासी शैक्षणिक विकास महामंडळ संस्था कुरखेडा संचालित आंचिव हायस्कूल, चिखली येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी नाशिक मुकेश साखरे, आंधळी याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. या यशाबद्दल त्याला दरमहा ₹1000/- शिष्यवृत्ती चार वर्षांसाठी मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाच्या निमित्ताने शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्था अध्यक्षा कोचे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक एम. एन. डहाडे, शिक्षक मुंगमोडे, म्हरस्कोल्हे, राखडे, भैसारे, नागपुरे सर, लिपिक पी. के. मेश्राम, शिपाई नामदेव बागडे, कांता मडावी आणि मार्गदर्शक रामटेके यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
नाशिक मुकेशच्या या यशामुळे संपूर्ण शाळा, गाव आणि संस्थेचा गौरव वाढला असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तो यशाची नवी शिखरे गाठेल, अशी शुभेच्छा शिक्षक आणि ग्रामस्थांनी दिल्या.
