– शविच्छेदनानंतर खुलासा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळच्या सुमारास युवती मृतावस्थेत आढळून आली होती. सदर घटनेचा शविच्छेदनानंतर खुलासा झाला असून गळा दाबून युवतीची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी इकराम सलाम शेख (वय ३०) यास पोलिसांनी अटक केली आहे.
कुरखेडा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भिंतीलगत आज २४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम हिचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनाकरीता दाखल करून तपासात घेण्यात आला होता. दरम्यान शरीरावर कुठलीही जखम अथवा मार लागल्याचे खुणा नसल्याने प्राथमिक वैद्यकीय तपासात युवतीचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. आता शविच्छेदनानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालात सदर युवतीची गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवत संशयित आरोपी इकराम सलाम शेख यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने जुन्या पैशाच्या वादातून हत्या केल्याचे कबुली दिली. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्य मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ करीत आहेत.
(#thegdv #thegadvishva #kurkheda #crimenews )