The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. १६ : श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे गुरुवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला .
यावेळी ध्वजारोहण अरुण पाटील मुनघाटे, सदस्य श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली तथा अध्यक्ष , शाळा समिती शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत शाळेतील परिसरामध्ये अध्यक्ष, शाळा समिती अरुण पाटील मुनघाटे, माजी स्वातंत्र्य सैनिक नामदेवरावजी बनपुरकर, माजी मुख्याध्यापक दखणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे, सेवानिवृत्त शिक्षक मधुकर लोथे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
कार्यक्रमाला अरुण पाटील मुनघाटे, सदस्य श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली तथा अध्यक्ष,, शाळा समिती शिवाजी हायस्कूल कुरखेडा, प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार, पर्यवेक्षक किशोर कोल्हे, माजी मुख्याध्यापक दखणे, भाऊराव बानबले, माजी शिक्षक सुरेश खेडीकर, महादेव नाकाडे , मधुकर लोथे, काळे , शिक्षक – पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे , शहर विकास मंच कुरखेडा चे अध्यक्ष माधवदास निरंकारी , माजी स्वातंत्र्य सैनिक नामदेवरावजी बनपुरकर , मोहन मनुजा , चिंचोलकर , श्रावण देशमुख , भारतीय महिला मंडळाचे कुरखेडा अध्यक्ष सुधाताई नाकाडे , सचिव आशाताई बानबले , मीनाताई भोयर , ठाकूर कुरखेडा नगरातील प्रतिष्ठीत मंडळी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )