
– निडर विटाभट्टी धारकांवर आशीर्वाद कुणाचा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १८ मे : तालुक्यातील कुंभिटोला हे गाव विविध प्रकरणाने जिल्हाभरात चर्चेला आले असून एक प्रकरण सुटत नाही तोवर दुसरे प्रकरण पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी सदर गावालगत असलेल्या विटाभट्टी धारकांवर प्रशासनाने कारवाई करत बंद केल्या होत्या मात्र त्याच सूचनेला आता विटाभट्टी धारक बगल देत नियमांना धाब्यावर बसवून निडर होत पुन्हा विटाभट्टी सुरू केल्याने सदर प्रकरण पुन्हा उजेडात आले आहे. त्यामुळे आता कुंभिटोला येथील विटाभट्टी प्रकरण पुन्हा तापणार असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहेत तर एकीकडे विटाभट्टी धारक निडर होत पुन्हा विटाभट्टी सुरू केल्याने त्यावर आशीर्वाद कोणाचा असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील कुंभिटोला येथील विटाभट्टी आणि अवैध रेती उत्खनन मागील काही महिन्यांपूर्वी चर्चेला आले होते. या विरोधात गावकऱ्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारत प्रशासनाला त्याविरोधात कारवाई करण्यास भाग पाडले होते. मात्र उपोषण करून व प्रशासनाने कारवाई करून सूचना दिल्यानंतरही अवैध रेती तस्करी व विटाभट्टी पुन्हा सुरूच असल्याने मात्र नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रेती तस्करांना रोखणाऱ्या नागरिकांवर ट्रॅक्टर चालकाने अंगावर ट्रॅक्टर आणत चिरडण्याचा प्रयत्न केला होता. तर कुंभिटोला गावालगत पुन्हा विटाभट्टी सुरू केल्याने विटाभट्टीतील राखळ गावात येत असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने विटाभट्टी धारक निडर होत असल्याने त्यांच्यावर कोणाचा आशीर्वाद असा देखील सवाल नागरिक करत असून प्रशासनाने त्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
एकूणच कुंभिटोला येथील अवैध रेती तस्करी व पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या विटाभट्टी यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(the gdv,the gadvishva, kurkheda, kumbhitola)

