कुरखेडा : काँग्रेसचा विजयघोष, आंधळीचे उपसरपंच अप्रव भैसारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २३ : तालुक्यातील आंधळी गावात काँग्रेसच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने राजकीय वातावरणाला नव्या घडामोडींची दिशा दिली. या सोहळ्यात प्रहारचे जिल्हा पदाधिकारी व आंधळीचे उपसरपंच अप्रव पुरंदर भैसारे, सामाजिक कार्यकर्ते गौरव रामटेके, सोनपूर-आंधळीचे उपसरपंच प्रवीण चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला नवी ऊर्जा दिली.
या कार्यक्रमाला आमदार रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, निरीक्षक सचिन नाईक, तालुका अध्यक्ष जीवन नाट, माजी सभापती परसराम टिकले, माजी जि. पं. सदस्य प्रभाकर तुलावी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
पुरुषांसोबत महिला शक्तीचाही मोठा सहभाग या सोहळ्यात पाहायला मिळाला. कमल जांभुळकर, संघमित्रा कराडे, शालूताई जांभुळकर, मिनाक्षी लाकडे, अंतकला कराडे आदी महिला प्रतिनिधींनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
यावेळी उपसरपंच अप्रव भैसारे यांनी सांगितले की, “दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध व वंचित घटकांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेस हेच सक्षम व्यासपीठ आहे. माझा सामाजिक कार्याचा अनुभव पक्षाच्या बळकटीसाठी उपयोगी पडेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर पडली असून कुरखेडा तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा वेग मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Congress #KurKheda #Politics













