कुरखेडा : नदीपात्रात आंघोळीकरीता गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

2587

कुरखेडा: नदीमध्ये आंघोळीकरीता गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा ( चेतन गहाने) दि. १३ : तालुक्यातील कढोली येथील नदीपात्रात आंघोळीकरीता गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. विशाल ताराचंद सहारे ( वय २०) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कढोली येथील सती नदीच्या घाटावर विशाल सहारे ( वय २०), अमन लक्ष्मण निंबेकर ( वय २०), प्रणय ऋषी सोनुले (वय २०), देवानंद मारुती चौधरी ( वय १९) व प्रज्योत वामन सहिरे (वय १४ ) हे पाच मित्र आंघोळ करण्यातकरीता गेल असता. विशाल सहारे यास खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती सोबत असलेल्या युवकांनी गावात सांगितली असता नदी घाटावर गावकऱ्यांनी गर्दी केली होती. कढोली येथीलच संतोष मानकर, सुरेश मानकर, निखिल मानकर, गंगाधर कोल्हे व गावकरी यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली असता घटनास्थळापासून अवघ्या दहा मीटर अंतरावर मृतदेह मिळाले असून शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
सदर घटनेने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #kurkheda #kadholi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here