कुरखेडा : रानटी हत्तीचा ‘या’ गावात रात्रो धुमाकूळ, घराची भिंत पाडली

1425

– घराची केली तोडफोड व धानाची नासाडी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १४ जून : छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने प्रवेश केला आहे. याच कळपातून विभक्त झालेल्या एका हत्तीने कुरखेडा तालुक्यातील दादापुर गावात प्रवेश करत एका घराची तोडफोड करत ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना मंगळवार १२ जून रोजी रात्रोच्या सुमारास घडली. सुदैवाने रानटी हत्तीने मनुष्यास कोणतीही इजा पोहचवली नाही. मात्र अचानक आलेल्या हत्तीने मात्र गावातील नागरिक भयभीत झाले असून दहशतीत आहेत.प्राप्त महितीनुसार, तालुक्यातील दादापुर येथील युवराज कोचे यांच्या कुटुंबातील व्यक्ती जेवण करून बसले होते दरम्यान अचानक कळपातून विभक्त झालेला एक हत्ती गावात प्रवेश करून युवराज कोचे याच्या घराची भिंत तोडून घरी प्रवेश करून घरात ठेवलेले 11 पोते धान व अन्न चाटले. हत्तींच्या अचानक येण्याने घरातील सर्व लोक घाबरून घरातून बाहेर पळाले. आवाज ऐकून गावातील नागरिक गोळा झाले व आवाज करून हत्तीला पळविण्याचा प्रयत्न केला असता पोटभर भात खाल्ल्यानंतर हत्ती तिथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान घटनेची माहिती पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात देण्यात आली असता वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोळे, क्षेत्र सहायक रामगड संजय कंकलवार, बीट गार्ड सुरेश रामटे यांनी घटनास्थळ गाठून हत्तीला दादापुर ला लागून असलेल्या जामटोला संकुलात पळविले. पाठलाग करूनही हा हत्ती पहाटे 2 वाजतापर्यंत दादापुर परिसरात परतला होता.
सदर घटनेने मात्र परिसरात दहशत पसरली असून भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या वतीने हत्तीच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली असून १३ जून ला सकाळच्या सुमारास धनेगाव परिसरात हत्तीचे दर्शन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here