कोरची येथे आ.कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ आरोग्य केंद्राचे उदघाटन

195

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा-कोरची, १३ जून : गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कोरची येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” चे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले. या दवाखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्यसुविधा सहज-सुलभ व जलदगतीने मिळण्यास नक्कीच मदत होईल, सर्वांनी या दवाखान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.
आपला दवाखाना आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविणे, सातत्यपूर्ण व गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देणे, विविध रोगाचा प्रादुर्भाव आणि निरिक्षण व नियंत्रण करणे, सुलभ व परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा देणे, शहरी भागातील गरीब रुग्णासाठी मोफत सोयीसुविधा असे विविध प्रकारच्या सेवा शहरी भागातील जनसामान्य गोर गरीब झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरीकांसाठी कोरची येथे आरोग्य विभागामार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” ही नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत स्थापित करण्यात आले. आपला दवाखाना अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी लसिकरण, महीण्यातील निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, बाहययंत्रणेव्दारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, याकरीता वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारीका, बहुदेशिय आरोग्य कर्मचारी, अटेन्डन गाई व सफाई कर्मचारी याप्रकारे मनुष्यबळ कार्यरत रराहणार आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार जिल्हयातील ठराविक नागरी आरोग्य केंद्रामध्ये पॉलिक्लिनीक सुरु केल्या जाणार असून यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ जनतेस दिला जाणार आहे. सर्वांनी या दवाखाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. जनसामान्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असुन आरोग्य केंद्रातून उपलब्ध सोयी सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार कृष्णा गजबे, कोरची चे वैद्यकीय अधिकारी, भाजप तालुका अध्यक्ष नसरूभाऊ भामानी, भाजप जिला पदाधिकारी प्रा. गजभिए, आनंद चौबे, कमल खंडेलवाल, तालुका महामंत्री नंदू पंजवानी, गुड्डू अग्रवाल, डॉ. शैलेंद्र जी बिसेन, नगर पंचायत उपाध्यक्ष हीरा राऊत तसेच आरोग्यवर्धिनी, आरोग्य सेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here