कुरखेडा : शिक्षकाने केली अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडछाड, गुन्हा दाखल

2841

तालुक्यासह शिक्षण विभागात खळबळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०१ : विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडछाड केल्याप्रकरणी त्या शिक्षकावर कुरखेडा पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सोच्या विविध कलमान्वये आज सांयकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने शिक्षण विभागासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घनश्याम मंगरू सरदारे (वय ४७) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो कुरखेडा तालुक्यातील एका जि.प. उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिच्या शरीराचा मुका घेणे, चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मुलीच्या पालकांनी मुलगी व गावकऱ्यासह कुरखेडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि ३५४(अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती असून प्रकरणाचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here