मोठी बातमी : पोलीस-नक्षल चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा

2756

-घटनास्थळावरून AK-47, LMG सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त
The गडविश्व
बिजापूर, दि. ०२ : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत ४ नक्षल्यांचा खात्मा केला आहे. चकमकीनंतर घटनास्थळावरून AK-47, LMG सारख्या स्वयंचलित शस्त्रांसह ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह सापडले.
बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात गांगलूर एरिया कमिटीचे नक्षली मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार, डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा, बस्तर फायटर्स, बस्तरिया बटालियन आणि सीएएफच्या जवानांन सोमवारी रात्री संयुक्त कारवाई करण्यास निघाले. मंगळवारी सकाळी जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. सुमारे ४५ ते ५० मिनिटे ही चकमक उडाली. दरम्यान पोलिसांचा दबाव बघता नक्षली जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. चकमकीनंतर घटनास्थळी जवानांनी शोधमोहीम राबविली असता चार नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बीजपुर जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघात येते, 19 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. याचा पार्श्वभूमीवर नक्षली आता सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळावर अद्यापही शोधमोहीम सुरू असून काही नक्षली घायल असण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #encounter #naxal #cgnews #bijapur )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here