०६ एप्रिलला ‘सर्च’ रुग्णालयात पोटविकार ओपीडी, एंडोस्कोपी व फाईब्रोस्कॅन तपासणी

44

The गडविश्व
गडचिरोली, दि.०२ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात ०६ एप्रिल २०२४ रोज शनिवारला पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. पोटविकार ओपीडी करीता नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने पोटविकार ओपीडीमध्ये तपासणी आणि एंडोस्कोपी व फाईब्रोस्कॅन तपासणी करण्यात येइल.
फायब्रोस्कॅन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी यकृताच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. हे यकृताची कडकपणा आणि लवचिकता मोजते, जे फायब्रोसिस आणि सिरोसिस सारख्या यकृत रोगांची उपस्थिती आणि तीव्रता याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करू शकते. यकृताची स्थिती निर्धारित करण्यासाठी हे उपकरण कंपनाचा वेग मोजते. हिपॅटायटीस सी, यकृत रोग आणि अल्कोहोल-संबंधित यकृत रोग यासारख्या परिस्थिती असलेल्या रुग्णांमध्ये यकृताच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी सहसा वापरली जाते. तसेच पचनसंस्थेशी निगडीत विकाराचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी उपचार केल्या जातील. पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल,मळमळणे,आतड्या मधील सुज,पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज,पोटात पाणी ही पोटविकाराची लक्षणे असू शकतात. पाचन चिन्हे आणि लक्षणे कशामुळे उद्भवत आहेत हे निर्धारित करण्यासाठी एंडोस्कोपी तपासणी केल्या जाईल.
सर्च रुग्णालयात विशेषज्ञ ओपीडीद्वारे तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा देण्यात येईल. तरी शनिवार, दिनांक- ०६ एप्रिल रोजी पोटविकार विशेषज्ञ ओपीडी आणि एंडोस्कोपी व फाईब्रोस्कॅन तपासणीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here