-महसुल विभागाने केला पंचनामा, कारवाईची प्रतीक्षा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : तालुक्यातील सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत वडगाव येथे नरेगाच्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ते टोली असा अंदाजे १२० मिटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात अवैध रेतीचा वापर होत असल्याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल महसूल विभागाने घेत सदर बांधकाम ठिकाणी पंचनामा केला असता सदर बांधकामात अवैध रेतीचाच वापर करण्यात करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अद्याप पर्यंत रेतीघाट सुरू झाले नाही. त्यामुळे शासनाच्या महसूल विभागाचा कोट्यावधीचा महसूल बूडत आहे. हा महसूल रेती माफियाच्या घशात जात असून याकडे महसूल विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार दिसून येत आहे. तरी महसूल विभाग याकडे जातीने लक्ष देतील का? असा प्रश्न जनता विचारीत आहे. धानोरा तालुक्यातील सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत वडगाव येथे नरेगाच्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ते टोली असा अंदाजे १२० मिटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहेअसू असून यात अवैध रेतीचा वापर होत असल्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महसूल विभागाने सदर रेतीचा पंचनामा करून रेतीचा कोणताही परवाना नसल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.
सदर बांधकामांचे अंदाजपत्रक 24 लाखाच्या घरात असल्याचे बोलले जाते. या रस्त्याच्या बांधकामात शासकीय नियमाप्रमाणे कर भरूनच वैध साहित्य खरेदी करावे लागते. असा नियम शासनाच्या परिपत्रकात आहे. याला हरताळ फासत येथील काम करणाऱ्या कंत्राटदाराने जवळपास असलेल्या कठाणी नदीवरून चक्क रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर द्वारे अवैध रेती वाहतूक करून काम करीत आहे. जवळच दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वडगाव येथे नरेगा मार्फत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामांमध्ये गिट्टी ही जशी एक एक करून ठेवल्या जाते त्या प्रकारे तिथे दिसून येत आहे. बांधकामचे फलक लावण्यात आले नाही. सदर कामांमध्ये अनियमितता असल्याचे गावकरी सांगतात. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत होती. दरम्यान येथील कामावर ३० मार्च ला मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन नरेगाच्या कामासाठी नरेगाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी अवैध रेतीचा वापर होत असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. यात अंदाजे ३० ब्रास रेतीची गरज आहे परंतु प्रत्यक्षात सध्या १० ब्रास रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी असल्याचे मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता काय कारवाई करण्यात येते याकडे लक्ष लागले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #narega #loksabhaelection2024 #ipl2024 )