पोलीस-नक्षल चकमकीतील मृतकांचा आकडा वाढला ; ९ नक्षली ठार

2247

-घटनास्थळावर शोधमोहीम सुरूच, काही नक्षली जखमी असल्याची शक्यता
The गडविश्व
बीजापूर, दि. ०२ : जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात आज २ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दुपारपर्यंत ४ नक्षली ठार झाल्याची माहिती समोर आली होती व ठार नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलिया होती. दरम्यान दुपारनंतर आणखी ५ नक्षलीचे मृतदेह आढळून आल्याची माहिती पुढे येत असून ठार झालेल्या नक्षलींचा आकडा आता नऊ (९) वर पोहचला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई असल्याचे समजते.
बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात गांगलूर एरिया कमिटीचे नक्षली मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ, कोबरा व सीआरपीएफ चे जवान संयुक्त कारवाई करण्यास निघाले असता चकमक उडाली. या चकमकीत नऊ नक्षल्यांचा खात्मा जवानांनी केला आहे. घटनास्थळावरून नऊ नक्षल्यांचे मृतदेह, ०१ LMG स्वयंचलित शस्त्र /BGL launchers, मोठ्या प्रमाणात साहित्य, स्फोटके व दैनंदिन साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या चकमकीत आणखी काही नक्षली जखमी व ठार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

हे ही वाचा : पोलीस-नक्षल चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा

(#bijapur #thegadvishva #thegdv #gadchirolilocalnews #naxal #encounter )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here