कुरखेडा : ‘108’ रुग्णवाहिकेच्या दाराला दोरीचा आधार, रुग्णांच्या जीवाशी धोकादायक खेळ!

89

कुरखेडा : ‘108’ रुग्णवाहिकेच्या दाराला दोरीचा आधार, रुग्णांच्या जीवाशी धोकादायक खेळ!
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १८ : रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून धावणाऱ्या ‘108’ रुग्णवाहिकेची अत्यंत धोकादायक अवस्था कूरखेडा-वडसा मार्गावर उघडकीस आली आहे. रुग्णवाहिकेच्या मागील दाराला चक्क दोरी बांधून वाहन रस्त्यावर धावत असल्याचे दृश्य पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या वाहनाची अशी दयनीय अवस्था पाहून आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजी कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. दरवाजा व्यवस्थित बंद राहत नसल्याने तो प्रवासादरम्यान कधीही उघडू शकतो. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, लाखो रुपयांच्या आरोग्य सेवेचे दावे करणाऱ्या यंत्रणेकडून रुग्णवाहिकांच्या देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष आता चव्हाट्यावर आले आहे. “जीव वाचवणारी रुग्णवाहिका स्वतःच धोक्यात आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सदर रुग्णवाहिका कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व ‘108’ रुग्णवाहिकांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #108Ambulance #Kurkheda #EmergencyService #AmbulanceSafety #HealthDepartment #PatientSafety #MaharashtraNews #Gadchiroli #BreakingNews #Negligence #PublicHealth #RoadSafety #108Service #HealthcareSystem #ViralNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here