कढोली -कुरखेडा मार्गावर दुचाकीचा अपघात : दोघेजण गंभीर जखमी

865

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ११ डिसेंबर : नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या खाली उतरत लोखंडी जाहीरात बोर्डाला धडकून अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघंजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ११ वाजताच्या सुमारास घडली. ओमकार गजानन भोयर (२२) रा. कढोली, रोहन प्रेमदास राऊत (२२) रा. खरकाडा असे जखमींची नावे आहे.
ओमकार व रोहन हे दुचाकीने जात असतांना कढोली मार्गावरील गांगोली वळणावर दुचाकी अनियंत्रित होता रस्त्याच्या खाली उतरत लोखंडी जाहीरात बोर्डाला धडकली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. लागलीच उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल करण्यात आले. मात्र ओमकार गजानन भोयर ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्नालयात हलविण्यात आले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Accident) (kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here