गडचिरोली : अनेकांचा बळी घेणारी वाघीण मोकाटच राहणार

3305

– जेरबंद करण्याचे निर्णय तूर्त स्थगित
The गडविश्व
गडचिरोली, ११ डिसेंबर : जिल्ह्यातील देसाईगंज व गडचिरोली वनविभागातील काही भागात अनेकांवर हल्ले करत ८ जणांचा बळी घेणारी टी-६ वाघीण जेरबंद करण्याचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला असून ही वाघीण पुन्हा काही दिवस मोकाटच राहणार आहे.
टी-६ वाघिणीने दोन महिन्यांपूर्वी ४ पिलांना जन्म दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. पिले लहान असल्याने त्यांना आईची गरज आहे या परिस्थितीत तिला पिलांपासून वेगळे करणे शक्य नसल्याने जेरबंद करण्याचा निर्णय तूर्त स्थगित ठेवण्यात आल्याचे कळते. या वाघिणीने गडचिरोली व देसाईगंज वनविभागात धुमाकूळ माजवत ८ जणांचे बळी घेतले आहेत. असे असतांना तिचा वावर चातगाव क्षेत्रात असून परिसरात भीती निर्माण झाली आहे. ह्या वाघिणीने दोन महिन्यांपूर्वी ४ पिलांना जन्म दिला हे नुकतेच वनविभागाच्या कॅमेराने टिपले आहे त्यामळे हि बाब उजेडात आली. अनेकांचा बळी घेतल्यानंतर या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश होते तशी तयारीही सुरु होती मात्र नुकतेच या वाघिणीचे बछडे असल्याची बाब उजेडात आल्याने आता मात्र या जेरबंद करण्याचे निर्णय तूर्त स्थगित करण्यात आले आहे. तर या वाघीनीचे चातगाव वनपरीक्षेत्रात अस्तित्व असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
जेरबंद करण्याच्या निर्णयाला तुर्त स्थगिती देण्यात आल्याने मात्र आता वाघीण मोकाटच राहणार आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिक पुन्हा धस्तावले आहे. बछडे असलेली वाघीण अधीक आक्रमक असते हे लक्षात घेता नागरिकांमध्ये दशहत निर्माण झाली आहे तर सदर वाघीण शिकारीसाठी पुन्हा मानवावर हल्ला करणार काय ? मानवावर हल्ला केल्यास काय परिणाम होणार ? वाघीन आता मानवावर हल्ला करणार नाही याबाबत वनविभाग उपायोजना करणार काय ? असे विविध संशोधनात्मक प्रश्न निर्माण होत असून वाघिणीच्या संपूर्ण हालचालीवर वनविभागाने पाळत ठेवणे आवश्यक आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Forest) (Tiger)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here