खुटगाव येथे गाव संघटनेने केला दारूमुक्तीचा निर्धार

297

-अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा कारवाई करू
The गडविश्व
गडचिरोली, ११ डिसेंबर : धानोरा तालुक्यातील खुटगाव येथील गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. सोबतच दारू विक्रेत्यांच्या घरी चातगाव पोलिस व गाव संघटनेच्या सदस्यांनी भेट देऊन नोटीस बजावली तसेच अवैध दारूविक्री बंद करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशाही सुचना देण्यात आल्या.
चातगाव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या खुटगाव गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलिस पथक व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील दारूविक्री करणाऱ्यांच्या घरी भेट देऊन तपासणी केली. सोबतच संबंधित विक्रेत्यांना नोटीस देऊन दारू विक्री करताना आढळून आल्यास कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व पोलिस कर्मचारी, मुक्तीपथचे तालुका संघटक अक्षय पेद्दीवार, पोलीस पाटील दिलीप लोंढे यांच्यासह गाव संघटनेचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here