The गडविश्व
गडचिरोली, ११ डिसेंबर : दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी मुक्तीपथ अभियानाने तालुका मुख्यालयी उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. एटापल्ली, मूलचेरा, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा येथील क्लिनिकला एकूण ४७ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला.
दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे गरजेचे झाले आहे. मात्र गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात ही सोय उपलब्ध नसल्याने रुग्णांना इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता मुक्तीपथ अभियानाने बाराही तालुका मुख्यालयी तालुका क्लिनिक सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या संधीचा लाभ घेतला आहे . गुरुवारी मूलचेरा ६, एटापल्ली ५, शुक्रवारी कुरखेडा १८ , अहेरी ७ व सिरोंचा येथील क्लिनिकला ११ रुग्णांनी भेट दिली. अशा एकूण ४७ रुग्णांवर उपचार करण्यात आला. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना औषधोपचारासह समुपदेशन देखील केले जाते. सोबतच दारूचे दुष्परिणाम, धोक्याचे घटक, शरीरावर होणारे बदल आदींची माहिती पटवून दिली जाते. तसेच एकदा उपचार घेतलेल्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा करीत त्यांची सध्यस्थीती जाणून घेतली जाते. आतापर्यंत अनेकांनी उपचार घेतला आहे. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या शहरातील तालुका क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन मुक्तीपथ अभियानाने केले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli) (Muktipath)