The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २० : येथील जे एस पी एम महाविद्यालयाचे प्राध्यापक यांचा बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकून आंदोलनात सहभागी होत आहे त्या आशयाचे निवेदन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जंबेवार मॅडम यांना दिले.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ व विजुक्टाने शिक्षकांच्या समस्येचे निराकरण होत नसल्याने यावर्षी राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या वर्ग बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तशी सूचना शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना प्रत्यक्ष तसेच सर्व जिल्हाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत सुद्धा दिलेली आहे व त्याची प्रत राज्य मंडळाला सुद्धा दिलेली आहे. महासंघाला संलग्न असलेली विजुक्टा या बहिष्काळात सहभागी आहे पर्यायाने आम्ही कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यामध्ये सहभागी आहोत याची नोंद घ्यावी. 21 फेब्रुवारी 2024 पासूनच्या या राज्यव्यापी बहिष्कार काळात आमचा सहभाग असेल, बहिष्कार चालू असेपर्यंत आम्ही राज्य मंडळांनी आयोजित वर्ग बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी संबंधित कोणतेही काम करणार नाही , दैनंदिन महाविद्यालयीन कामकाज सुरळीतपणे पार पाडू त्यात कोणतेही व्यत्यय येणार नाही, महासंघ व विजुक्टाने बहिष्कार मागे घेतल्यानंतर बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम केले जाईल यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले .
निवेदन देतेवेळी प्रा.टिकाराम धाकडे, प्रा.कैलास खोब्रागडे, प्रा. निवेदिता वटक, प्रा. भाविकदास करमणकर, प्रा.विराग रणदिवे, प्रा.संजय मांडवगडे व प्रा. वसंत आवारी हे उपस्थित होते.