The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, (चेतन गहाने) २६ ऑक्टोबर : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बिनशर्त वयाची अट शिथिल करीत आरोग्य विभागाच्या रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणी करीता राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समीतीचा वतीने पूकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात कुरखेडा तालूक्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले व आज येथील तालूका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत तहसीलदार मार्फत शाशासनाला मागणीचे निवेदन पाठविले.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी मागील १७ वर्षापासून अतिशय तूटपूंज्या मानधनात शहरी भागासह ग्रामीण व दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोनाच्या कठीन काळात अतिशय जोखमीची व अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे मात्र शासनाचे पूर्णता दूर्लक्ष आहे. शासनाने कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे ३१ मार्च २०२३ पर्यंत समायोजन करीत त्याना नियमित करण्यात येईल असे सांगीतले होते मात्र वारंवार आश्वासने देऊनही मागणी पूर्ण होत नसल्याने संतप्त संघटनेने टप्प्या टप्प्याने सूरू असलेल्या आंदोलनाला गती देत आज गूरूवार पासून बेमूदत कामबंद आंदोलन सूरू केले आहे.
उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा तसेच तालूका आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामीण दूर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथील व्यवस्थेवर या कामबंद आंदोलनाचा मोठा फटका बसलेला आहे. उपजिल्हा रूग्णालयातील रक्ततपासणी विभागासह इतर नियमित कामकाज सूद्धा प्रभावित झाले आहे. तालूका मूख्यालयात आज पासून सूरू बेमूदत कामबंद आंदोलन व धरणे आंदोलनाचे नेतृत्व समायोजन कृती समीतीचे मुख्य समन्वयक डॉ.राकेश येरणे एन.एच.एम संघटनेचे ता अध्यक्ष हेमंत बोरकर, राहूल बडोले, विनोद दूफारे, डॉ योगेश मानकर, डॉ प्रशांत देशमुख करीत आहेत. तर आंदोलनात आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
