– वाहनासह १६ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : जिल्ह्यात आयपीएल ऑनलाईन सट्टा चे जाळे पसरल्याचे दिसून येत असून पोलीसांनी मोठी कारवाई देसाईगंज येथे करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी वाहनासह तब्बल १६ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत. त्या पाश्वभुमीवर १ मे रोजी पोस्टे देसांईगंज हद्दीत आयपीएल सट्टा खेळवणारे इसमाबाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे आदेशान्वये पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार यांनी देसाईगंज शहरातील विर्शि टी. पाँईट चौक येथे सापळा रचुन नाकाबंदी केली असता नाकाबंदीदरम्यान एमएच ३३ एसी ५४४३ क्रमांकाची चारचाकी वाहन येत असल्याचे पाहून सदर वाहन चालकास थांबण्याचे इशारा देवुन वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये वाहन चालकाकडे जुनी वापरते दोन मोबाईल व वाहनामध्ये ३ लाख ६६ हजार ९०० रुपये रोख रक्कम मिळून आल्याने सदर ईसमास विचारणा केली असता त्यांनी सर्च इंजीनच्या साहाय्याने वेबसाईटचा वापर करुन युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयपीएलवर सट्टा खेळत असून आज रोजी चालू असलेल्या सामन्यावर सट्टा लावल्याचे निदर्शणास आले. यावेळी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेवून 3 लाख ६६ हजार ९०० रुपये रोख रक्कम व दोन जुने वापरते मोबाईल तसेच चारचाकी वाहन असा एकुण १६ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीने हा ऑनलाईन सट्टा अन्य एका साथीदाराच्या मदतीने चालु असल्याचे सांगीतले यावरुन नवीश नरळ रा. शेगांव ता. वरोरा जिल्हा. चंद्रपूर व चेतन पुरूपोत्तम मस्के रा. कोरेगांव ता.देसाईगंज या दोघाविरुध्द पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे देसाईगंज अजय जगताप, पोउपनि ज्ञानेश्वर धनगर हे दाखल गुन्हयाचा पुढिल तपास करीत आहेत. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #ipl2024 )