सीआरपीएफ प्राणहिता कॅम्प अहेरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

231

– योगानेच मन आणि आत्मा अधिक सुंदर बनवता येते असल्याचे प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २२ जून : ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन २१ जून २०२३ रोजी ०९ बटालियन आणि ३७ बटालियन, सीआरपीएफ प्राणहिता कॅम्प, अहेरी येथे कमांडंट एम. एच. खोब्रागडे आणि आर. एस. बालापूरकर यांच्या मार्गदर्शनखाली पुर्ण करण्यात आला. ज्यामध्ये दलातील जवान व कुटुंबीय व अहेरी परिसरातील मान्यवर तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांनी विशेष रस दाखवून उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी कमांडंट एम.एच. खोब्रागडे व आर.एस. बालापूरकर यांनी आपल्या भाषणात सर्व लाभार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, योग हे एक प्राचीन शास्त्र आहे, जे आज संपूर्ण जगाच्या लोकांमध्ये झपाट्याने पोहोचवण्याची गरज आहे. आजच्या वातावरणात योगासने हे असे माध्यम आहे की ज्याद्वारे सर्व लोक निरोगी राहू शकतात आणि सुखी जगाची कल्पना फक्त निरोगी लोकच करू शकतात. म्हणूनच यावेळच्या योग दिनाची थीम “वसुधैव कुटुंबकम्साठी योग” ठेवण्यात आली आहे.त्याच क्रमाने, कमांडंट ०९ बटालियन आणि ३७ बटालियन ने देखील माहिती देत योग सर्वांसाठी आवश्यक असला तरी, सैन्याच्या जवानांसाठी ते अधिक महत्वाचे आहे, कारण दलातील जवानांच्या जीवनात नेहमीच तणाव आणि अडचणी येतात. “योग शरीर आणि आत्म्यासाठी एक देणगी आहे, योग ही स्वतःशी जोडण्याची संधी आहे.” म्हणून, सैनिकांचे मानसिक संतुलन आणि आरोग्य तसेच त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक सौहार्द / सहजतेसाठी योग अधिक महत्त्वपूर्ण बनतो.
कार्यक्रमात सुजित कुमार, द्वितीय कमान अधिकारी, बिमल राज सी, द्वितीय कमान अधिकारी, शिव कुमार राव, द्वितीय कमान अधिकारी, डॉ. श्रीनिवासुलू रेड्डी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, नितीन कुमार, उप कमांडंट, बिजेंद्र कुमार, डेप्युटी कमांडंट, संतोष कुमार, डेप्युटी कमांडंट, डॉ. अरविंद सातोरे, वैद्यकीय अधिकारी व बटालियनचे अधिकारी, अधिनस्त अधिकारी व जवान उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, International Yoga Day celebrated at CRPF Pranhita Camp Aheri)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here