कुरखेडा : रिवायंडिंग दुकानाचे कुलूप तोडून मौल्यवान तांब्याची चोरी

446

– तालुक्यातील दुसरी चोरीची घटना
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २२ जून : तालुक्यातील गेवर्धा येथील रिवायंडिंग दुकानाचे ताळे तोडून मौल्यवान तांब्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील महिनाभरातील हि दुसरी घटना असून दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
वैजनाथ नामदेव कांबळे यांच्या घरालगत असलेल्या मोटर रिवायंडिंग च्या दुकानात मध्य रात्री चोरट्यांनी दुकानाचे ताळे फोडून शटर उचलून मोटर रीवाइंडिंग चे तांबे अंदाजीत किंमत ४० ते ४५ हजार रुपयाचे चोरटयांनी लंपास केले. महिनाभरापूर्वी कुरखेडा येथील राउत इलेक्ट्रिक यांच्या दुकानाचे कुलूप फोडून चोरटयांनी ३ लाखाचे तांबे लंपास केले होते. विशेष म्हणजे रात्रो झालेल्या चोरीच्या ठिकाणी बारश्याचा कार्यक्रम आटोपला होता सर्व दिवस भराच्या कामात थकुन असल्याने सर्व नितांत अवस्थेत झोपुन असल्याने चोरट्याने याचा पुरेपुर फायदा घेत चोरी करण्यात यशस्वी ठरला. अश्या वाढत्या चोरीला आळा घालण्यात पोलिस प्रशासन किती सक्रियता दाखवते याच्यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. यासंदर्भात कुरखेडा पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here