अबब… आधार कार्ड चिमुकल्याचा आणि फोटो फडणवीसांचा, शाळेतही मिळाला प्रवेश

3754

सिंदेवाही तालुक्यातील प्रकार
The गडविश्व
चंद्रपूर, २२ जून  : आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्र म्हणून पाहिल्या जाते मात्र त्यावर चुका असतील तर मात्र दे दुरुस्त करणे आवश्यक असते अन्यथा त्यावर लाभ घेता येत नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील जिगल जीवन सावसाकडे या सात वर्षीय चिमुकल्याच्या आधार कार्डवर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असल्याचे उघडकीस आल्याने मात्र खळबळ उडाली असून शाळेतही याच आधार कार्ड वर प्रवेशही मिळाल्याने तेथील शिक्षक किती कार्यतत्पर आहे हे दिसून येत आहे.
जिगलचा जन्म चिमूर तालुक्यातीलआजोळी शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २०१५ रोजी झाला. आईचे माहेर शंकरपूरजवळील शिवरा येथील असून शंकरपूर येथे आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये जिगलचे आधार कार्ड काढले. आधार कार्ड घरी आले तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जिगलचा आधार कार्ड वर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसल्याने सारेजण चक्रावले.चूक लक्षात आली असता जिगलच्या आईने अपडेट करण्याच्या घोळामध्ये सात वर्षांपासून मुलाच्या आधार कार्डवर देवेंद्र फडणवीसांचाच फोटो आहे. तर त्याच आधार कार्डवर शाळेतही प्रवेश घेण्यात आला.एरवी शाळेत प्रवेश घेताना शिक्षकांकडून सर्व कागदपत्रे तपासूनच प्रवेश दिला जातो मात्र जिगलच्या आधार कार्ड वरील फोटो दुसरा असतांना प्रवेश दिलाच कसा ? यावरून तेथील शिक्षकांची कार्यतत्परता दिसून येत असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तब्बल सात वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने मात्र सर्वत्र याची चर्चा होत आहे तर आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी मुलाच्या आईने आधार केंद्रामध्ये चकरा मारणे सुरू केले असल्याचे कळते.
(the gdv, the gadvishva, chandrpur, chimur, sindewahi, addhar card)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here