मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुरखेड्यात रक्तदानाचा प्रेरणादायी उपक्रम ; २५ रक्तदात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सप्ताह’ अभियानाअंतर्गत कुरखेडा येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले, तर महिला पदाधिकाऱ्यांनीही रक्तदानात सहभाग नोंदवत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुका कुरखेडाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे हा उपक्रम पार पडला. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्वाखाली आयोजित शिबिरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल गिरणारे आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनीही रक्तदान करून उपक्रमात सहभाग नोंदविला.
रक्तदान करणाऱ्यांमध्ये चांगदेव फाये, रूपाली कावळे, राकेश चौहान, श्रीकांत नागीलवार, धनंजय नाकाडे, मंगेश दखणे, रितेश माखिजा, चेतन गाहणे, नितेश लांजेवार, मनोज भैय्या, किशोर खुणे, डॉ. पुरुषोत्तम नेवारे, रोहन सूर्यवंशी, मोहन माळी, अनिल गिरणारे, अतुल वालीखाये, निखिल लांडगे, राहुल पाल, विनोद श्रीरामे, मिराज बेग, सूरज निहारे, आशुतोष दांडेकर, भामेश्वर दलावर, अंकुश ठाकूर आदींचा समावेश होता.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर आणि डॉ. जगदीश बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नगरसेविका अल्का गिरडकर, जयश्री मडावी, अहिल्याताई लोथे, मोनेश मेश्राम, रोशन सय्यद, भाग्यवान जनबंधू, तुषार कुथे, लक्ष्मण धुळसे, बंटी देवढगले, मंगेश मांडवे, लोमेश किरसाण, राहुल गिरडकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे व कल्पना भट, निशा चचाने, श्यामला कांबळे, दीक्षा जोगे, प्रज्वल गेडाम तसेच गडचिरोली येथील रक्त संक्रमण पथकातील राहुल सिडाम, प्रफुल राऊत, शरद बांबोडे, जावेद शेख आणि निकेश भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.
उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य समाजोपयोगी सेवेशी जोडत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशा समाजहिताच्या उपक्रमांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.













