–दोन उमेदवारांची माघार
The गडविश्व
गडचिरोली दि.३० : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.
हे उमेदवार आहेत रिंगणात
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :
१) अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ)
२) डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),
३) योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :
१) धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत)
२) बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी)
३) सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा)
३) हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार :
१) करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी)
२) विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन)
३) विनोद गुरुदास मडावी, अपक्ष ( अंगठी)