-येवली दारूबंदी समितीचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : तालुक्यातील येवली येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी दारूबंदी समिती व ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले आहेत. नुकतीच गावात बैठक घेऊन दारूविक्रेत्यांविरोधात कठोर निर्णय घेऊन गावातील विक्रेत्यांना नोटीस देत नियमांचे उल्लंघन केल्यास गावातून तडीपार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
येवली गावात अंदाजे ३००० लोकसंख्या आहे. या गावात ११ ते १२ दारू विक्रेते आहेत. देशी, विदेशी, मोहाची अवैध दारू विक्री सुरू असल्याने दारूविक्री बंद असलेल्या बाजूचे शिवणी, डोंगरगाव, मारकबोडी, गोविंदपूर, दर्शनी, हिरापुर या गावातील दारू पिणारे शौकीन लोक दारू पिण्यासाठी सकाळ, संध्याकाळ येवली येथे गर्दी करतात. त्यामुळे वाढलेले भांडण तंटे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठीण झाले आहे. अशातच आर्थिक नुकसान, आरोग्य , वाढलेलेव्यसनाचे प्रमाण लक्षात घेता गावानी पुढाकार घेऊन दारू बंदीसाठी सभा घेतली. सभेत गावातील आजी, माजी पदाधिकारी युवक, महिलांच्या उपस्थितीत राहून विचार विनिमय करून समिती गठित करण्यात आली. सभेत दारू विक्रेत्याकडे दारू आढळल्यास २० हजार रुपये दंड घेण्यात येईल. विक्रेत्यांना कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायत कडून शासकीय दाखले देण्यात येणार नाही. दारू विक्रेत्यास मदत करणाऱ्याला किंवा जमानत घेणाऱ्याकडून ५ हजार रुपये दंड घेण्यात येईल तसेच ग्रामपंचायत कडून शासकीय दाखले देण्यात येणार नाही. मुजोरी करून दारूविक्री केल्यास त्याला गावातून तडीपार करण्यात येईल. गावाच्या सीमेवर सुद्धा अवैध दारूविक्री करण्यास परवानगी नाही, असे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे ठणकावून सांगण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )