मिनी बस नदीमध्ये कोसळून भीषण अपघात ; दहापेक्षा अधिकांचा मृत्यू

1527

– जखमींचा आकडाही मोठा, प्रशासनाची धावाधाव
The गडविश्व
बद्रीनाथ, दि. २५ : उत्तराखंडमधील नदीमध्ये मिनी बस कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना पुढे येत आहे. या अपघातात आतापर्यंत १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून काहीजण गंभीर जखमी असल्याचे बोलल्या जात आहे.
बद्रीनाथ महामार्गावरून मिनी बस ट्रॅव्हरल जात होती. त्यामध्ये १० पेक्षा अधिक प्रवाशी होते. दरम्यान रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली जवळ मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत कोसळले. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेले वाहन बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

https://x.com/PTI_News/status/1801882725202202706?t=Sx4D9d4mmJKF7akZZaV7-Q&s=19

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #roadaccident #badrinathaccident #alaknandariver)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here