गडचिरोलीच्या सीमेलगत उडाली पोलीस – नक्षल चकमक ; ८ नक्षली ठार, एक जवान शहीद

4151

– दोन जवान जखमी, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त
The गडविश्व
नारायणपूर, दि. १५ : छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूरच्या अबुझमाड येथील कुतुल परिसरात पोलिस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी ८ नक्षल्यांना ठार केले असून यात एक जवानही शहीद तर दोन जवान जखमी झाले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले आहे.
छत्तीसगडच्या कुतुल, फरसाबेडा, कोडामेटा परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता बस्तर विभागातील जगदलपूर, दंतेवाडा, कोंडागाव आणि कांकेर येथून सुमारे १४०० डीआरजी आणि एसटीएफ जवानांना नक्षलविरोधी अभियानास पाठवण्यात आले. दरम्यान नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा पोलिस स्टेशन अंतर्गत फरसाबेदा-धुरबेडा परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली यात ०८ नक्षल्यांनी ठार करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार माडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू आहे. घटनस्थावरुन बंदुका आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तर या चकमकीत एसटीएफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे.©©©

https://x.com/ANI/status/1801962657077133539?t=lR_36iu5PYkq9HxccBf8Qg&s=19

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal #encounternaxal #cgnews #narayanpur #abuzamad #abujhamad )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here