– बामणी पोलीस व मुक्तीपथची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद व गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांकडून जवळपास 2 लाख रुपये किंमतीचा गुळाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व दारू नष्ट केल्याची कारवाई बामणी पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जाफराबाद व गर्कापेठा या दोन्ही गावांमध्ये अवैध दारूविक्री केली जाते. गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी मुक्तीपथ, पोलिस व गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु गावातील काही मुजोर दारू विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. संबंधित गावातील विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी गुळाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे बामणी पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने दोन्ही गावांमध्ये शोधमोहीम राबवून २६ ड्रम गुळाचा सडवा, ५० लिटर दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई बामणीचे प्रभारी पोलिस अधिकारी प्रमोद किरसंगे व टीमने केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )