शेकडो नागरिकांनी घेतला निशुल्क आयुर्वेद शिबिराचा लाभ

158

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि.१४ : सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य गुरुवर्य कै. प्र. ता. जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा ब्रम्हपुरी,
महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी तथा युवारंग लोकहीत संघटना आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क वातरोग, त्वचा रोग श्वसन रोग आयुर्वेद शिबिराचे आयोजन १० जानेवारी २०२४ ला महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथे करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन म्हणुन शिक्षण महर्षी भाग्यवानजी खोब्रागडे तर अध्यक्ष म्हणुन निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.हिरालाल मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, डॉ. महेश कोपुलवार, प्रा. डोर्लीकर , डॉ. शितल सुपारे उपस्थित होते. याप्रसंगी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवारंग लोकहीत संघटनेचे अध्यक्ष राहुल जुआरे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य घडविणारे प्रा. सदानंद सोनटक्के यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या शिबिरामध्ये आरमोरी तालुक्यातील शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला सर्व रुग्णाची तपासणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा ब्रम्हपुरीच्या तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते पार पडली ज्यामध्ये डॉ.नरेश देशमुख, डॉ.रमेश कारवट, डॉ. सुनील नाकाडे, डॉ.रामेश्वर राकडे, डॉ.गिरीश शेंडे, डॉ.रोहित चिलबुले, डॉ.सुप्रिया नाकाडे, डॉ. अंजू राऊत, डॉ.अर्पणा कन्नमवार, डॉ .श्वेता राखडे, डॉ.प्रणय कोसे, डॉ.हिरालाल मेश्राम, डॉ. श्रुती दांडगे, डॉ. शितल सुपारे, डॉ. ओमप्रकाश नाकाडे, डॉ.खोब्रागडे, डॉ. अनोले, डॉ.सतीश निमजे, डॉ .सुनिता देशमुख, डॉ. सोनम लीचडे या नि शुल्क शिबिरामध्ये रुग्णांना तत्कालीन फायदा होण्याकरिता आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ज्यामध्ये अग्निकर्म विद्यकर्म, स्वेदन, स्नेहन, रक्तमोक्षण तत्काळ करून देण्यात आले व रुग्णांना ५ दिवसाचे औषध मोफत देण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी क्लिनिक ब्रम्हपुरी चे कर्मचारी, युवारंग लोकहीत संघटना, आरमोरी चे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here