उदय धकाते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्काराने सन्मानित

88

The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : यावर्षीच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर पुरस्काराने चांदा शिक्षण मंडळ चंद्रपूर संचालीत वसंत विद्यालय, गडचिरोली येथील मुख्य लिपिक उदय बळीरामजी धकाते यांना सन्मानित करण्यातआहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातर्फे प्रतीवर्षी राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून हा सर्वोच्च मानाचा हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर पुरस्कारासाठी  चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथील मुख्य लिपिक उदय बळीरामजी धकाते यांची निवड करण्यात आली.  शिक्षकेत्तर कर्मचारी मधून या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील एका शिक्षकेत्तर कर्मचारीची निवड झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला हा प्रथमच मानाचा बहुमान उदय धकाते यांच्या रूपाने मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी शहिद बालाजी सभागृह, पिंपळनेरी रोड, चिमूर, ता.चिमूर, जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. सदर राज्यस्तरीय अधिवेशनात अभिजित वंजारी, पदवीधर आमदार नागपूर विभाग हे उपस्थित होते.
यसदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, उपाध्यक्ष प्रिया पवार, रविंद्र गवळी, उपाध्यक्ष, खैरुद्दीन सय्यद उपाध्यक्ष, उपाध्यक्षा सरीता कुलकर्णी, उपाध्यक्षा देविदास पंडागळे, डॉ. गोवर्धन पांडुळे, विभागीय कार्यवाह, मुंबई विभाग, गजानन नानचे, विभागीय कार्यवाह, कोल्हापुर विभाग, संजय कावळे, विभागीय कार्यवाह, संभाजीनगर विभाग, राजेश्वर चापुले, श्रीधर गोंधळी
उपाध्यक्ष डी. पी. महाले, विभागीय कार्यवाह, नाशिक विभाग डॉ. विजय ताले,विभागीय कार्यवाह, लातुर विभाग विभागीय कार्यवाह, अमरावती विभाग, सुखदेव कंद कोषाध्यक्ष रामचंद्र केळकर अंतर्गत हिशोबनीस,मार्गदर्शन समिती गणपत बागडी-कोल्हापूर, आप्पासाहेब खराडे-सांगली, चंद्रकांत जोशी रत्नागिरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ चे जिल्हा अध्यक्ष अशोक काचिनवार, कार्याध्यक्ष संदीप भरणे, उपाध्यक्ष संघमित्रा वाळके, उपाध्यक्ष नंदलाल लाडे, शैलेश कापकर,कोषाध्यक्ष अभिजित शिवणकर, प्रमोद येलमुले, अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, हेमंत रामटेके, बंडू शिवणकर, घनश्याम नैताम,
डोमळे, मडावी, आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here