– सौहार्द व ऐक्याचा संदेश
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ५ : जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटी कुरखेडा यांच्या पुढाकाराने इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी पैगंबरांच्या जीवनगुणांचे गुणगान करीत विविध देखाव्यांसह ही मिरवणूक जामा मस्जिद येथून सुरुवात करून मौलाना आजाद चौक, डॉ. आंबेडकर चौक, फव्वारा चौक, सागर चौक, हनुमान मंदिर, कूंभीटोला रोड मार्गे पुन्हा जामा मस्जिद येथे दाखल झाली.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिक आरिफ हुसैन सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रथम हाफीज़ फैज़ल यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करून देशातील सौहार्द, शांतता आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. सागर चौकात फीरोज मिस्त्री यांच्या पुढाकाराने आम लंगरचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन उस्मान खान व शादाब खान यांनी केले. जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी मसूद शेख, उपाध्यक्ष बबलू भाई हुसैनी, हाजी अमानूल्लाह खान, हाजी नवाब हाशमी, हाजी सलीम खाणानी, हाजी मूर्तूजा अहेमद, हाजी बब्बू मस्तान, हाजी मूजफ्फर बारी, हाजी मकसूद खान यांच्यासह अनेक मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटीचे अध्यक्ष न्याज सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्सवातून कुरखेडा शहरात धार्मिक सौहार्द आणि ऐक्याचा संदेश दिला गेला.














