कोठी येथे भव्य जनसभा संपन्न : ग्रामस्थांच्या समस्या ऐकून तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन

233

The गडविश्व
भामरागड, दि. ०५ : येथे ग्रामस्थांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आयोजित भव्य जनसभा उत्साहात पार पडली. सभेला तब्बल १५० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी तसेच व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रतिनिधींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अर्जुन आलाम होते. त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल विश्वास, माजी जि.प. सदस्य जाखिर हुशेन, तालुका उपाध्यक्ष जाधव हलदार आणि लक्ष्मण वड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत वैयक्तिक वनहक्क दावे तात्काळ उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे ठरविण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांशी थेट पत्रव्यवहार करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आलाम यांनी स्पष्ट केले. पेसा अधिकारी श्रीकांत नैताम यांनी दर महिन्याला पेसा ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, गावात हर घर नळ योजना अंतर्गत नळजोडणी झाली असली तरी पाणीपुरवठा ठप्प असून तीन बोरवेल असतानाही पाणीटंचाई जाणवत असल्याची समस्या ग्रामस्थांनी मांडली. यावर लवकरच ठोस उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
गावकऱ्यांच्या प्रश्नांना थेट ऐकून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here