जिल्हा परिषद शाळेत “इंग्रजी माध्यमाचे” पर्यायी शिक्षण शासनाने अनिवार्य करा

150

जिल्हा परिषद शाळेत “इंग्रजी माध्यमाचे” पर्यायी शिक्षण शासनाने अनिवार्य करा
– आझाद समाज पार्टी ची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३० : “शिक्षण” हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत आणि संविधानिक अधिकार आहे. आणि संविधानाच्या कलम 14 नुसार वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे. परंतु खाजगीकरणाच्या या काळाबाजारात ज्यांना मोफत शिक्षण मिळते त्यांना दर्जेदार शिक्षण सरकार कडून मिळत नाही ही शोकांतिका आहे. खाजगी शाळा मध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळते पण जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजी माध्यम नसल्याने जिल्हा परिषद शाळेत शिकणारा मुलगा पुढे स्पर्धेत टिकत नाही. कारण त्याला ती संधीच मिळालेली नसते. दुसरी गोष्ट श्रीमंत, धनाढ्य लोकांसारखे गरीब शेतकरी, मजूर पाल्य ५०-५० हजार फीस खाजगी शाळेत किंवा कॉन्वेंट मध्ये देऊ शकत नाही. हा एक प्रकारे त्या पाल्यावर व मुलावर अन्याय आणि त्यांच्या हक्क अधिकाराचे हनन आहे. खाजगीकरणामुळे केवळ श्रीमंत मुलांनाच दर्जेदार व उच्च प्रतीच्या वातावरणात शिक्षण मिळते परंतु गरीब, शेतकरी, कामगारांच्या मुलांना पैश्या अभावी खाजगी शाळेत शिक्षण घेता येत नाही. हा सरकारच्या माध्यमातून समाजात निर्माण केलेला जाणीवपूर्वक भेदभाव आहे, असच असा आरोप आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला.
या देशातील प्रत्येक मुलास समान शिक्षण मिळावे म्हणून जिल्ह्यातील नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी माध्यम सुरु करण्यात यावे. तसेच देशात आणि राज्यात शिक्षण असमान असू नये याकरिता CBSE (Central Board Secondary Education) माध्यमातून शिक्षण द्यावे. अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात यावी यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी मार्फत शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
कुरखेडा मध्ये किसान आघाडी अध्यक्ष सचिन गेडाम, जिल्हा सचिव कुणाल मच्छीरके, युवा आघाडी अध्यक्ष रोहित कोडवते, आदिवासी विकास परिषदेचे अंकुश कोकोडे, प्रवीण कोवाची,प्रशांत मेश्राम आझाद समाज पार्टी तालुका सचिव, स्वप्नील उर्फ सोनूभाऊ चौधरी, मयूर सहारे, आनंदराव सुखदेवे, संदीप मेश्राम, वाल्मिक लाडे, सचिन मेश्राम, दिलीप सहारे यांचे नेतृत्वात शिक्षण मंत्री निवेदन देण्यात आले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here