गडचिरोली : जनजागृती करून साजरा केला जागतिक व्याघ्र दिन

238

The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन सादरा केला जातो. यानिमित्ताने व्याघ्र संवर्धनाची गरज आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती केली जाते. त्याचेच औचित्य साधून चांदाळा येथे जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करणे आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करणे हा एक जागतिक उपक्रम आहे. या निमित्त चांदाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. वाघ भव्य प्राण्यांना हवामान बदल, अवैध वन्यजीव व्यापार आणि अधिवास नष्ट होण्यासह असंख्य धोक्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट झाली आहे तसेच वाघाचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक कडयामी, शिक्षक मडावी, शिक्षिका वैद्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम उप वनसंवरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनात, वन परीक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्रासाहाय्य्क एस नवघरे, वनरक्षक आर मगणूरवार, वनरक्षक गौरव हेमके,  आर टी सदस्य अजय कुकडकर, मकसूद सय्यद, गुणवंत बाबनवाडे, कुणाल निमगडे यांनी पार पाडला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #tigerday )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here