गडचिरोली रंगणार ‘लोककलेच्या रंगांनी’ : २७ जुलैला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

798

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा विविधतेने नटलेला नजराणा आता गडचिरोलीकर रसिकांसमोर सादर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ‘रंग लोककलेचा’ या भव्य सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात पार पडणार आहे. अजब-गजब विचार मंच आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात काय असेल खास?

गोंधळ, वासुदेव, शेतकरी व आदिवासी नृत्य, भारुड, लावणी, कोळी गीत, धार्मिक नृत्य, देशभक्तिपर गीतांचे नृत्यसादरीकरण तसेच थोर महापुरुषांच्या जीवनगाथेचे प्रभावी सादरीकरण अशा बहारदार लोककलांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. या सर्व सादरीकरणासाठी मुंबई येथील नामवंत कलावंत विशेषतः गडचिरोलीत दाखल होणार आहेत.
या सांस्कृतिक सोहळ्यास गडचिरोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सुभाष धंदरे, दत्तू सुत्रपवार, चेतन गोरे, विश्राम होकम, प्रवीण खडसे, सचिन मून, मिलिंद उमरे यांनी केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #RangLokkaletcha
#FolkArtFestival #CulturalEvent #TraditionalDance
#MaharashtraFolkArts #ServiceFortnight
#MilindNarote #FolkDanceShow #गडचिरोली #रंग_लोककलेचा #लोककला #सांस्कृतिककार्यक्रम #सेवा_पंधरवडा #महाराष्ट्राची_लोककला #नृत्याविष्कार #आमदार_मिलिंद_नरोटे #अजब_गजब_विचार_मंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here