The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना शनिवार २ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास पोर्ला नजीक घडली. समीर भानारकर (२३), प्रशांत म्हस्के (२६) दोघेही रा.पोर्ला अशी मृतकांची नावे आहेत.
समीर आणि प्रशांत हे गडचिरोली येथे काही कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते सायंकाळच्या सुमारास दुचाकीने स्वागावी पोर्ला येथे जात होते. दरम्यान पोर्ला नजीकच्या ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
गडचिरोली येथून पोर्ला-ठाणेगाव-आरमोरी तसेच नागपूर जाणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. छत्तीसगड ला जाण्यासाठी याचा मार्गाचा वापर जडवाहने करीत असतात त्यामुळे देखील या मार्गाने वाहनांची वर्दळ असते.