गडचिरोली : युवकाचा अपहरण करायला गेले मात्र डाव फसला, दोघांना अटक

2565

– सात जण फरार, घटनेने खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, १७ जून : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस ऐकायला मिळत आहे. अशातच जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या मुडझा येथील एका युवकाचा जुन्या वादातून काही युवकांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र गावातील नागरिकांच्या सतर्कतेने अपहरणकर्त्यांचा डाव फसला आणि अल्पवयीन दोन बालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर सात जण फरार आहे. ही घटना गुरुवार १५ जून रोजी रात्रोच्या सुमारास घडली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. फरार असलेल्यांमध्ये राजेंद्र ऊर्फ गोलू संपन मंडल रा. कुनघाडा ता. चामोर्शी, नकुल भोयर रा. चामोर्शी, मुस्तफा पठाण रा. कुनघाडा व इतर चार जणांचा समावेश असून इतर चार जणांची नावे कळू शकली नाही.
मुडझा येथील समीर चौधरी यासोबत कुणघाडा येथील अल्पवयीन मुलाचा जुना वाद होता. त्याचाच राग धरून गुरुवारी रात्रोच्या सुमारास दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्या शाब्दिक चकमकीत समीरचा अपहरण करण्याची धमकी दिली. रात्रो ११ वाजताच्या सुमारास थार चारचाकी व दुचाकी वाहनाने मुडझा येथे पोहचून समीरला मारहाण केली. यावेळी नागरिकांना सदर बाब लक्षात येताच नागरिक जमा झाले असता आरोपींनी दुचाकीवर समीर ला उचलून घेऊन गेले. मात्र या झटापटीत नागरिकांनी एकाला पकडले. समीरला वाकडी फाटा, गोंडवाना सैनिकी स्कुल पर्यंत नेले असता नागरिकांनी पकडलेल्या आरोपीचा फोन येताच समीरला गावाच्या टोलीवर आणून सोडत फरार झाले. समिरने घडलेला प्रकार नागरिकांना सांगितला व ताब्यात घेतलेल्या आरोपीला समीरने ओळखत घडलेल्या घटनेबाबत पोलीस ठाणे गडचिरोली येथे माहिती दिली असता लागलीच पोलीस मुडझा येथे पोहचून नागरिकांनी पकडून ठेवलेल्या आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेली व समीरच्या तक्रारीवरून विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला. त्यास विचारपूर केली असता दुसऱ्या अल्पवयीन बालकासही ताब्यात घेऊन फरार आरोपींबाबत माहिती पोलिसांना कळली. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
सदर घटनेने मात्र खळबळ उडाली असून शुल्लक वादावरून अपहरण सारख्या घटनेने त्यात अल्पवयीन बालकाचा समावेश असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ती ‘थार’ कुणाची

समीरने सांगितल्या प्रमाणे अपहरण करण्याकरिता दुचाकी व चारचाकी वाहनाचा वापर करण्यात आला होता. त्यात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन हे ‘थार’ असल्याचे सांगितले आहे. थार ही महिंद्रा कंपनीची वाहन असून सध्याच्या घडली या वाहनाची क्रेझ आहे. किंमतीनेही अधिक असल्याने हे वाहन सहसा सामान्य व्यक्तीला वापरु शकत नाही. त्यामुळे या घटनेत असलेली ती ‘थार’वाहन ही कोणत्या तरी बड्या श्रीमंत व्यक्तीची अथवा गुन्हेगारी प्रवुत्ती च्या इसमाची असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. इतरही आरोपीचा शोध लागल्यास या अपहरणाचा उलगडा होणार आहे.

(the gadvishva, gadchiroli news, crime news, gadchiroli police, mudza)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here