वैरागड येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिवस साजरा

208

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १७ जून : ग्रामपंचायत वैरागड येथे आज १५ जून जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिवस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन 14567 तर्फे साजरा करण्यात आला. 60 वर्ष नंतरच्या काळात होणारे अन्याय, अत्याचार विरुद्ध लढा देऊन आपले जिवन सुखी करण्याबाबत मार्गदर्शन, आणि ज्येष्ठांच्या मदतीला असलेली ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन 14567 अंतर्गत देण्यात येणाऱ्या माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार, प्रत्यक्ष मदत याबाबत जनजागृती करण्यात आली.
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व त्या प्रमाणात असणाऱ्या सेवा सुविधा यामुळे घरगुती समस्यांसह जेष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना या समस्यतून बाहेर काढण्यासाठी ‘एल्डर लाइन’ उपक्रम केंद्र शासनाच्या मदतीने सुरु करण्यात आला आहे .
जिल्ह्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अनेकांना मुले सांभाळत नाहीत. सून जेवायला देत नाही तर काहींना नातव त्रास देतात, तसेच काही जेष्टांना घराबाहेर करण्याचे प्रकारही घडत आहेत. या सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत सर्व राज्यांत एल्डर हेल्पलाईन सुरु झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फ़ौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फ़ौंडेशन पुणे द्वारे चालवली जात आहे. 14567 हा या हेल्पलाइनचा क्रमांक आहे. एल्डर लाइनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास जेष्ठ नागरिकांना माहिती, मार्गदर्शन ,भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर आधार दिला जातो. गेल्या दोन वर्षात जिल्यात अनेक जेष्टांना एल्डर लाइनचा आधार मिळाला असल्याची माहिती एल्डर लाइनचे जिल्हा समन्वयक गणेश शेंडे यांनी दिली .
यावेळी सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भाष्कर बोडणे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here