The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०४ : महाराष्ट्रातील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील श्रीमती निर्मला टीकाराम पाटील झोडे यांचे गुरुवार ०४ जानेवारी रोजी रात्रो ११ वाजता अल्पशा आजाराने ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार ५ जानेवारी ला दुपारी १२.३० वाजता कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, nirmala tikaram patil zode kumbhitola kurkhed, best formar awards in maharashtra state)